ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
अंजनगाव बारीत इसमाची हत्या

अंजनगाव बारी : येथील रामगीर महाराज मंदिर मार्गावर ३५ वर्षीय इसमाचा चाकूने गळा कापून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रोशन महेंद्रसिगं नाईक (३५) रा. पंचशीलनगर, तपोवन, अमरावती असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृतदेह रामगीर महाराज मंदिर मार्गाजवळ आढळून आला.
त्याच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती अज्ञात व्यक्तीने बडनेरा पोलिसांना दिली असता ठाणेदार सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. रोशनची हत्या कोणी व का केली, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनाम करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला आहे. घटनेचा पुढील तपास बडनेरा पोलिस करीत आहेत.